‘पॅडमॅन’ चित्रपटाचं पाचवे पोस्टर रिलीज

२६ जानेवारीला प्रदर्शित होणार ‘पॅडमॅन’

टीम महाराष्ट्र देशा – अक्षय कुमारच्या आगामी पॅडमॅन या चित्रपटाचा आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. पॅडमॅनच्या या पोस्टरमध्ये पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत या चित्रपटाची मुख्य नायिका राधिका आपटे देखील दिसत आहे. अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर रिलीज केले आहे.या पोस्टरमध्ये राधिका ग्रामीण भागातील अगदी सामान्य गृहिणी सारखी दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत अक्षय कुमारच्या मागे उभ्या असलेल्या राधिकाच्या हातात सॅनिटरी नॅपकिन आहे. या पोस्टरसोबत अक्षयने ‘माझी पत्नी देखील विचारतेय की चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज करणार?’ असे ट्विट केले आहे.हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार असून आंध्रप्रदेश मधील रिअल लाईफ हिरो अरुणाचलम मुरुगनाथनम यांच्या जीवनावर आधारित आहे.

You might also like
Comments
Loading...