शेतकऱ्यांसाठी निम्मे उत्पन्न द्यायलाही तयार असणारा अक्षय कुमार

akshay kumar

मुंबई : जसा स्वच्छ भारत टॅक्स लावला, तशी तरतूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करा. जो फक्त शेतकऱ्यांना दिला जावा. शेतकऱ्यांसाठी माझ्या उत्पन्नातील अर्धा वाटा देण्यासही मी तयार आहे, असा दिलदारपणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘माझा कट्टा’वर व्यक्त केला.

बॉलिवूडचा जेंटलमन अक्षय कुमारने ‘माझा कट्टा’वर आज दिलखुलास गप्पा मारल्या. शेतकऱ्यांप्रती असलेलं त्याचं संवेदनशील मन यानिमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आली.

टॅक्समध्ये शेतकऱ्यांसाठी तरतूद हवी

Loading...

जसा स्वच्छ भारत टॅक्स लावला, तशीच तरतूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करायला हवी. यातून जमा होणारा पैसा फक्त शेतकऱ्यांना दिला जावा. मी स्वत: असा कर द्यायला तयार आहे, असं अक्षय म्हणाला.

शेतकऱ्यांना उभं करणे आवश्यक

शेतकऱ्याला केवळ पैसे देऊन उपयोग नाही, तर त्याला उभं करायला हवं. यासाठी शेतकऱ्यांना विविध शेतीचे धडेही देणं आवश्यक आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता आहे. त्यामुळे त्याला उभं करणं आवश्यक असल्याचं अक्षयने नमूद केलं.

शेतकरी आपला अन्नदाता

शेतकरी सर्वांना अन्न पुरवतो, मात्र त्याच्यावर आज वाईट वेळ आली आहे. यावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे. तसंच शेतकऱ्यांबाबत धोरणं योग्य की अयोग्य हे सांगण्याइतपत मी तज्ज्ञ नाही, त्यामुळे त्याबाबत बोलणं योग्य होणार नाही, असं अक्षय म्हणाला.

जवानांप्रमाणेच शेतकरी महत्त्वाचा

जय जवान, जय किसान हा नारा माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला. जसा जवान महत्त्वाचा आहे, तसाच शेतकरी. आपल्याकडे जवानांवर मोठा निधी खर्च होतो, तसाच शेतकऱ्यांवरही व्हायला हवा. शेतकरी जगला तर देश जगेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.

आई-वडील हेच दैवत

समाजाप्रती जागृकता ही संस्कारातून येते. मला माझ्या आई-वडिलांकडून हे संस्कार मिळाले. आई-वडील हेच प्रत्येकाचे दैवत असायला हवे. त्यांच्या चरणीच स्वर्ग आहे. देव-देवतांवर दूध- तेल ओतण्यापेक्षा दुष्काळी शेतकऱ्यांना द्या, असं आवाहनही त्याने केलं.

भारत सहिष्णुच हे आंधळाही सांगेल

यावेळी अक्षय कुमारला देशातील वातावरण आणि आमीर खानने केलेल्या असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्यावरही विचारण्यात आलं. यावर अक्षय म्हणाला,  भारत हा खूप सहिष्णु देश आहे. एखादा आंधळाही याबाबत जाहिररित्या सांगू शकेल.

कन्हैया कुमार काय बोलला हे माहित नाही

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेल्या प्रकाराबाबत बोलण्यास अक्षय कुमारने नकार दिला. कारण आपण कोणीही तिथे उपस्थित नव्हतो, त्यामुळे जेएनयूमध्ये नेमकं काय झालं, हे मला माहित नाही. त्यामुळे चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं, असं अक्षय कुमारने नमूद केलं.

महत्त्वाचे मुद्दे

स्वच्छ भारतसाठी टॅक्स लावला,तसा शेतकऱ्यांसाठीही देशवासियांवर टॅक्स लावा – अक्षय कुमार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या सर्वांसाठी लाजिरवाण्या : अक्षय कुमार

शेतकऱ्यांना मदत म्हणून पैसे देणं गरजेचं नाही, त्यांना उभं करणं आवश्यक : अक्षय कुमार

माझे वडीलही शेती करायचे, त्यामुळे शेतकऱ्यांचं दु:ख मी जाणतो : अक्षय कुमार

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणाला फोर्स करु नका, स्वत:ला वाटेल तेव्हा करतील : अक्षय कुमार

सलमानसारखी बॉलिवूड मंडळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अनेक समाजकार्य करतात : अक्षय कुमार

जय जवान, जय किसान नारा दिला : अक्षय कुमार

जवानांप्रमाणेच शेतकरीही महत्त्वाचा, तो आपल्याला अन्न पुरवतो : अक्षय कुमार

शेतकरी सर्वांना अन्न देतो, हे लक्षात ठेवा : अक्षय कुमार

मार्शल आर्टच्या माध्यमातून आम्ही 8 हजार तरुणींना स्वरक्षणाचं प्रशिक्षण दिलं : अक्षय कुमार

तकऱ्यांना आणखी कशी मदत करु शकतो, याचा विचार करतो आहे

शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकरी व्हावंसं वाटत नाही, हे दुर्दैवी आहे –

सिनेमांमध्ये कितीही अॅक्शन करत असलो, तरी एखाद्या रडण्याच्या सीनवेळी डोळ्यात अश्रू येतात

बॉलिवूडमध्ये अनेकजण आपापल्या परीने अनेकांना मदत करत असतात

सैनिकांसाठी जेवढा निधी खर्च केला जातो, तेवढा शेतकऱ्यांसाठी होतो का?

मार्शल आर्टचं तरुणींना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे

शेतकऱ्यांना भेटून शेतीसंबंधित धोरण ठरवायला हवं

महिला या पुरुषापेक्षा अधिक कणखर असतात

शेतकरी दत्तक योजनांसारखे प्रकल्प हाती घ्यायला हवेत

माझ्या मुलीने तिची काही खेळणी गरीब मुलांना देण्यासाठी काढून ठेवली आहेत

मदत करण्याची भावना ही कुटुंबातील संस्कारातूनच शिकता येते

शेतकऱ्यांच्या समस्यांवर एका सिनेमाचा विचार सुरु आहे

देवावर दूध, तेल घालून काहीही उपयोग नाही, ते शेतकऱ्यांना द्या

महिलांना कुठेही बंदी नको, शनि चौथरा प्रकरणावर अक्षय कुमारची भूमिका

अभिनेता, संगीतकार, गायिका इत्यादी सर्वांना पुरस्कार, मग स्टंटमनसाठी का नाही?

हिंदू-मुस्लीम असा भेदभाव मी करत नाही – अक्षय कुमार

बॉलिवूडमध्ये धर्माच्या नावावर दोन गट नाहीत – अक्षय कुमार

पाच वर्षांचा असताना मुंबईत आलो – अक्षय कुमार

Source – ABP MAZA