शिवाजी महाराजांनी संकटांशी लढण्याची शिकवण दिली; अक्षय कुमारकडून पूरग्रस्तांना दिलासा

टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी संकटांशी लढण्याची शिकवण दिली, असा संदेश अक्षय कुमारने पूरग्रस्तांना दिला. तसेच पुढे बोलताना म्हणाला, सर्वांनी धीर धरा असे म्हणत अक्षय कुमारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

तसेच पूरग्रस्तांसाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळेच मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. संवेदनशील अभिनेता म्हणून ओळख असणारा तसंच समाजकार्यात नेहमीच पुढे असणारा खिलाडी अक्षय कुमारनेदेखील सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी एक खास संदेश पाठवला आहे.

दरम्यान, या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.