खिलाडी अक्षय कुमारने मनसेसमोर घेतली नमती भूमिका

टीम महाराष्ट्र देशा : अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा बहुचर्चित सिनेमा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे ‘मिशन मंगल’ हा चित्रपट डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. परंतु मनसेच्या विरोधामुळे त्याने माघार घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी आतापर्यंत आंदोलन करत आलो. आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. १५ ऑगस्टला अक्षय कुमार यांचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा जगामध्ये हिंदीत प्रदर्शित होत आहे, तो महाराष्ट्रात हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेतील ‘मिशन मंगल’ला आमचा विरोध नाही, पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे. इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी करायचं काय?” असा प्रश्न उपस्थित करत खोपकर यांनी विरोध दर्शवला आहे.

Loading...

तसेच पुढे बोलताना अमेय खोपकर यांनी ‘इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मनचिकसे मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील. चित्रपटगृहांच्या मालकांनाही ते परवडणार नाही.’मिशन मंगल’ हा चित्रपट मराठीत डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा असंही मनसेने म्हटले आहे.

तसेच सिनेमा रिशुट करायला आमचा विरोध नाही. आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर ‘मिशन मंगल’ मराठीत डब करून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही असही पुढे बोलताना म्हणाले आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
त्या ५० तबलिगींनी लवकरात लवकर पुढे यावे, अन्यथा....
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'इशारा'; मदत केली तर ठीक, अन्यथा…
निलेश राणेंचा राज्यसरकारवर घणाघात, म्हणाले....
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
'जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, नाहीतर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा