परिस्थितीला पायाशी झुकवलं, भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला नायब तहसीलदार

akshay gadling

अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.

दरम्यान, अशात गरिबी काय असते हे अत्यंत जवळून अनुभवलेले, पण दारिद्र्याने लढायची प्रेरणा दिली. अन् मग सुरू झाला अधिकारी बनण्याचा प्रवास… या प्रवासात अनेक खाचखळगे लागले. पण कोणत्याही परिस्थितीत न थांबता प्रवास पूर्ण करायचा असा चंग बांधून परिस्थितीला हरवायचं आणि आकाशाला गवसणी घालायची ही जिद्द होती एका भंगार गोळा करणाऱ्या लेकाची म्हणजे अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे राहणाऱ्या अक्षय गडलिंगची.

या परीक्षेत अमरावतीच्या तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला. अक्षयची घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट असताना त्याने प्रचंड अभ्यास करत यशाचा डोंगर उभा केला. अक्षय तिवसा येथील आपल्या झोपडीत दिवा लावून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. मात्र, त्याने आपल्या गरीबीचं कधीही भांडवल केलं नाही. त्याच्या जिद्द आणि चकाटीसमोर आज दारिद्र्यलाही झुकावं लागलं. विशेष म्हणजे अक्षयने स्पर्धा परीक्षेचा कुठलाही क्लास न लावता फक्त वचनालयतून अभ्यास करत विजयाला गवसणी घातली

अक्षयने शाळेच्या वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि इतर स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिकंसुद्धा पटकावले आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्याने याआधी पीएसआय वन विभागाची परीक्षादेखील पास केली होती. मात्र, काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही. तरीही तो खचला नाही. त्याने अभ्यास सतत चालू ठेवला.

यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आज गोपीनाथ मुंडेच हवे होते, भाजप नेत्यांना मुंडे साहेबांची आठवण

अक्षय हा लहानपणापासूनच हुशार आहे. त्याने वादविवाद स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली. त्याची वेगळे काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्याने अधिकारी होण्याचं ठरवलं. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अक्षय खचला नाही. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग यांचा गेल्या 40 वर्षांपासून भंगार आणि रांगोळी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गरिबीची चणचण अक्षयला भासू नये यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता होऊ दिली नाही. ध्येयवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बळगलं, हे स्वप्न त्याने वयाच्या 25 वर्षी सत्यात उतरवलं आहे. अखेर अक्षय आज नायब तहसीलदार झाला !

‘शेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी सोमवारपासून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन’