संविधान की कुराण तरुणांचा शरद पवारांना सवाल

akshay bikkad and sharad pawar

पुणे-  तिहेरी तलाकचं अप्रत्यक्षपणे समर्थन करणारे राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा माजी कृषिमंत्री शरद पवार यांना पुण्यातील काही तरुण भेटून संविधान किंवा कुराण यापैकी एक निवडून आपली भूमिका स्पष्ट करा असं सांगणार आहेत.
औरंगाबाद येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाच्या सभेत बोलताना शरद पवार यांनी काल अप्रत्यक्षरित्या तिहेरी तलाकच समर्थन केल्याचं चित्र काल अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. हल्लाबोल यात्रेच्या औरंगाबाद येथील समारोप सभेत बोलताना तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे. त्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्यांना नाही असं वक्तव्य पवारांनी करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सध्या भाजपकडून मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे तसेच सोशल मीडियावर देखील उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यापार्श्वभूमीवर पुण्यातील काही तरुण शरद पवार यांची भेट घेऊन संविधान किंवा कुराण यापैकी एक निवडून आपली भूमिका स्पष्ट करा असं सांगणार आहेत. याबद्दल फेसबुक वर पोस्ट करून अक्षय बिक्कड या तरुणाने शरद पवार यांना भेटणार असल्याचे जाहीर केलं आहे. अक्षय बरोबर प्रवीण काळे आकाश देशमुख हे देखील पवारांची भेट घेणार असल्याचं महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना अक्षयने सांगितले.

नेमकं काय म्हणणं आहे तरुणांचं ?

शरद पवारांसारख्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या ज्येष्ठ नेत्याने असे बेजबाबदार वक्तव्य करून जातीयवादला खतपाणी घालणं चुकीचं आहे. नेहमीच उलट्या सुलट्या भूमिका घेणाऱ्या पवारांनी किमान या संवेदनशील विषयावर तरी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी महाराष्ट्रातील पुरोगामी तरुणांची अपेक्षा आहे.या भूमिकेतून आम्ही त्यांची भेट घेणार आहोत.आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका जाहीर करणार आहोत.

नेमके काय म्हणाले होते पवार पहा हा व्हिडीओ

2 Comments

Click here to post a comment