Akshardham Pune- अक्षरधाम दील्ली व गुजरात ची प्रतिकृती पुण्यात

शहरातील पहिले भव्य स्वामी नारायण मंदिर

पुणे : मुंबई-बेंगळुरू महामार्गावर आंबेगाव खुर्र्द  येथे २७ एकरच्या विस्तीर्ण परिसरात स्थापन करण्यात आलेल्या भगवान श्री स्वामीनारायण मंदिराची स्थापना फेब्रुवारी महिन्यात झाली. बीएपीएस संस्थेचे देशात एकूण अकराशे मंदिर आहेत. त्यापैकी पुण्यातील स्वामी नारायण मंदिर एक आहे. मंदिराच्या सुंदरतेचे प्रमाण वाढले असून. भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. भाविकांसाठी मंदिर सकाळी 7:30 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत  दर्शनासाठी खुले असते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले स्वामी नारायण मंदीर आजूबाजूच्या हिरव्या डोंगराळ परीसरामुळे भाविकांना आकर्षित करत आहे. मंदिरात आत प्रेवेश केल्यावर दील्ली व गुजरात मधील अक्षरधाम मंदिराची प्रतीक्रुती नजरे समोर येते. शांततेचे प्रतीक असलेले स्वामीनारायण मंदिर परिसरात भाविकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आहे. तसेच संध्याकाळी मंदिराला विधुत्त रोशनाई मुळे अप्रतिम सौंदर्य प्राप्त होते. रंग बेरंगी कारंजे व मंद आवाजात देवाचे शोल्क त्यात आणखी भर घालतात. पुण्यातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून स्वामी नारायण मंदिराची भक्तगणात चर्चा सुरू आहे. अतिशय उत्कृष्ट असलेले स्वामी नारायण मंदीर परिवाराला घेऊन जाण्यासारखे आहे. इथे अत्यंत स्वच्छता असून पार्किंग पासून सगळ्या सोई विनामूल्य आहेत. सर्वत्र नेमलेली माणसे मदत करण्यासाठी तत्पर असतात. सुंदर हसरा निसर्ग चहूकडे हिरवेगार लॉन्स हे सगळ पाहून येण्याच सार्थक होत.

Rohan Deshmukh
  • स्वामी नारायण मंदिर जाण्यासाठी शिवाजी नगर व स्वारगेट वरून बस सुरू आहेत. तसेच कात्रज वरून रिक्षा उपलब्ध .
Latur Advt
Comments
Loading...