कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 2-कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st Test) कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (Axar Patel) च्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताने शनिवारी पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळून आघाडी घेतली. अक्षर पटेलने या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासोबतच काईल जेमिसनने शेन बाँडचा विक्रमही मोडला आहे.
अक्षर पटेलने सलग 6 डावात 4 किंवा त्याहून अधिक कसोटी विकेट घेतल्या आहेत. इतर कोणताही भारतीय गोलंदाज सलग चार डावांपेक्षा जास्त अशी कामगिरी करू शकलेला नाही. अक्षरने न्यूझीलंडच्या 34 षटकांत 62 धावांत पाच बळी घेतले. दुसऱ्या सत्रात त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या सत्रात रॉस टेलर (11), हेन्री निकोल्स (2) आणि टॉम लॅथम (282 चेंडूत 95) यांना 13 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शेवटच्या सत्रात त्याने टॉम ब्लंडेल (13) आणि टीम साऊथी (5) वर बाद केले.
अक्षरचे शेवटचे ७ कसोटी सामने
2/40
५/६०
६/३८
५/३२
४/६८
५/४८
५/६२
पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ५ बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अक्षर पटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी भारतासाठी लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि नरेंद्र हिरवाणी यांनी त्यांच्या पहिल्या चार कसोटीत तीन वेळा पाच बळी घेतले होते.
पहिल्या चार कसोटीत सर्वाधिक पाच बळी
6 चार्ली टर्नर
5 टॉम रिचर्डसन / रॉडनी हॉग / अक्षर पटेल
4 फ्रेड स्पॉफर्थ / सिड बार्न्स / निक कुक / व्हर्नन फिलँडर
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<