जय भगवान महासंघाच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी अक्षय मुंडे यांची निवड

टीम महाराष्ट्र देशा – जय भगवान महासंघाच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदी परळी येथील युवा नेते, उद्योजक अक्षय मुंडे यांची निवड झाली आहे. जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ही निवड केली आहे.

अक्षय मुंडे हे सामाजिक कामात सक्रीय होते. आजवर त्यांनी अनेक तरुणांना उद्योजकतेकडे जाण्यासाठी मदत केली आहे. जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी युवा नेते प्रदीप घोडके उद्योजक अविनाश घुगे उद्योजक अभय घुगे यांच्या उपस्थितीत मध्ये निवड केली. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे.