VIDEO: बंदोबस्त सोडून ऑन ड्युटी पोलीसाचा ‘डान्स’

अकोला – धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत खाकी वर्दी घालून ग्रामस्थांच्या खांद्यावर बसून नाचणारे  जिल्ह्यातील बोरगावमंजूचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांचा सर्वत्र निषेध होत आहे. काटकर यांच्या या वर्तनाने खाकी वर्दीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही ठाणेदाराच्या वर्तनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
मिरवणुकीत कर्कश्य संगीतावर काही तरुणांनी ठेका धरला होता. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असल्याने पोलिस कर्मचारी व ठाणेदार काटकर बंदोबस्तावर होते. मात्र बंदोबस्त सोडून काटकर यांना नाचतांना बघून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कर्तव्यावर असतांना शिस्त लावायचे सोडून नागरिकांमध्ये सामील होऊन. त्यांच्या खांद्यावर नाचणाऱ्या ठाणेदाराचा विडीओ समोर आला आहे. ही प्रवृत्ती संपूर्ण पोलिस विभागाला शरमेने मान खाली घालवणारी आहे. तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजीत पाटील हेच  गृहराज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच तालुक्यात असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.