अकोला महापालिकेचा अफलातून पारदर्शक कारभार

पिण्यासाठी टंचाई, नासाडीसाठी मुबलक

अकोला / सचिन मुर्तडकर : अकोला जिल्ह्यात यावर्षी पाऊस खूप कमी पडल्याने पिण्याच्या पाणीची टंचाई निर्माण झालेली आहे. असे असताना सोमवारी कावड महोत्सवात काहीही गरज नसताना व कोणाचीही मागणी नसताना खुद्द महापौरांनी पाईप लावून पाण्याची नासाडी केली. यावरून पारदर्शकतेचे दावे करणाऱ्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांना अकोलेकरांची पिण्याच्या पाण्याची किती काळजी आहे ते स्पष्ट झाले.

भरपावसाळ्यात अकोलेकरांना तब्बल आठ दिवसातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लागू झाल्यानंतर खरेतर महापालिकेने स्वतः पाण्याच्या काटकसरीची काळजी घेऊन लोकांनाही काटकासरीचे आवाहन करणे अपेक्षित होते. पण झाले मात्र वेगळेच. अकोलेकरांना चार दिवसाने होणारा पाणीपुरवठा थेट आठ दिवसाने करण्याचा निर्णय झाल्यानंतर लगेच दोन दिवसात खुद्द महापौर विजय अग्रवाल यांनी सोमवारी गांधी मार्गावर पाईप हातात घेऊन हजारो लिटर पाण्याची अक्षरशः नासाडी केली.

निमित्त होते कावड यात्रेचे. कावड यात्रेतील शिवभक्तांवर पाईपणे पाण्याचे फवारे मारून महापौरांनी आपली अफलातून भाविकता दाखविण्याचा प्रयत्न केला. खरेतर कावड यात्रा सुरू असताना पाऊस पडला होता. त्यामुळे पाईपणे आशा प्रकारे पाणी फवरण्याची काहीही गरज नव्हती, पाऊस पडला नसता तरीही कावडधारी कधीही अशा प्रकारे पाण्याची नासाडी करून आपल्यावर पाणी फवारण्याची मागणी करीत नाहीत.

आपल्या महापालिकेने दोनच दिवसाआधी शहरातील नागरिकांना चार दिवसाने होणार पाणी पुरवठा आठ दिवसावर नेला असताना आपण अशा भीषण टंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी कसे रस्त्यावर वाया घालवावे, अशा अफलातून व अविचारी उपक्रमातून कोणता देव प्रसन्न होऊ शकतो? याचा कोणताही विचार पारदर्शक कारभाराचे दावे करणाऱ्या भाजपच्या महापौरांनी केला नाही. अकोलेकरांकडून मात्र या अविचारी व अविवेकी कृतीचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

पहा व्हिडिओ महापौरांच्या अफलातून भाविकतेचा

You might also like
Comments
Loading...