fbpx

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी माकड !

सोलापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्क्लकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात दररोज हजारो भाविक येऊन दर्शन घेतात. कुठल्याही दिवशी या मंदिरात भाविकांची तितकीच वर्दळ पाहायला मिळते. परंतु नुकतेच भाविकांना स्वामींच्या मंदिरात चक्क माकडाचे ध्यान पहायला मिळाले.

सकाळी गर्दीच्या वेळी मंदिराच्या गाभाऱयाच्या बाजूला लोकांना माकडाचे दर्शन झाले. मंदिरात हे माकड आले कसे असा प्रश्नही अनेकांना पडले. मंदिराच्या दाराजवळ हे माकड तब्बल 10 मिनीटे बसून ध्यान करत होते. दोन्ही हात मंदिराच्या प्रवेश दराच्या उंबरठय़ावर ठेवून डोळे बंद करून ते बसले होते.मंदिरात अचानक आलेल्या माकडाला पाहून तेथिल काही भाविकांनी त्याच्या बाजुला खाण्यासाठी दाणे ठेवले पण माकट चिंतनात इतके व्यस्त होते की त्याने आजूबाजूला पाहिलेही नाही. स्वामींच्या गाभाऱ्यात सुरू असलेली पूजा त्या माकडाने दरवाजात बसून पाहिली.