fbpx

प.महाराष्ट्रात आणखी एक कॉंग्रेसचा आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आघाडीतील पक्षांमधून विशेषतः कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर आउट गोइंग सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील याचे प्रतिबिंब पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बडे प्रस्थ मानले गेलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे युतीला अतिशय पोषक वातावरण तयार झाल्याने आघातील अनेक दिग्गज मंडळी सेना किंवा भाजपच्या वाटेवर आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी अद्याप आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा अर्ज काँग्रेस भवनाकडे केलेला नाही ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या मतदारसंघातून नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास काँग्रेसकडून इच्छुक असल्याचा अर्ज काँग्रेसकडे केला आहे