भाजपला हरवण्यासाठी कुठलीही तडजोड करायची तयारी – अखिलेश यादव

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीत तयारीच्या दृष्टीने भाजपाला पराभूत करण्यासाठी वेळ पडल्यास काहीही करण्याची आपली तयारी असल्याचे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सांगितले यासाठी आपण कुठलीही तडजोड करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. ते आज लखनऊ येथील जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी अखिलेश यांनी म्हटले की, 2019 च्या निवडणुकीतही आमची बसपाशी असलेली युती कायम राहील. आम्ही त्याच्यासाठी जास्त जागा सोडण्यास तयार आहोत. मात्र, भाजपाचा पराभव आम्हाला करायचाच आहे. असे अखिलेश यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी लोकसभा निवडणुकीत कमीपणा घेण्याची तयारी दर्शविली आहे. नुकत्याच झालेल्या कैराना लोकसभा निवणुकीत या दोनही पक्षांनी एकत्र येत भाजपचा पराभव केला होता.Loading…
Loading...