आता बस्स ! कॉंग्रेस सोबत आघाडीसाठी वेळ नाही – अखिलेश यादव

टीम महाराष्ट्र देशा : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आम्ही आता काँग्रेसची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, असे समाजवादी पार्टीने शनिवारी स्पष्ट केले. काँग्रेसऐवजी बसपाच्या नेत्या मायावती यांच्यासमवेत आघाडी करण्याचेही सपाने संकेत दिले.

काँग्रेसने आम्हाला दीर्घकाळ प्रतीक्षेत ठेवले, आणखी किती काळ प्रतीक्षा करावयाची, असा सवाल सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. आता आम्ही गोंडवाना गणतंत्र पक्षासमवेत चर्चा करणार आहोत, यापूर्वी त्यांच्याशी आघाडी करण्यात आली होती. त्यामुळे गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि बसपा यांच्याशी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहोत, असे यादव यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

You might also like
Comments
Loading...