भाजपच्या पराभवाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसची आणखी एक मोठा पक्ष साथ सोडणार

rahul-gandhi

नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाने काँग्रेसची साथ सोडल्याने संकटात सापडलेल्या कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समाजवादी पक्षाने काँग्रेसचा हात सोडत बहुजन समाज पक्षसोबत संसार थाटण्याचा निश्चय केला आहे. राजकारणात कोणीच कोणाची वाट पाहत नाही असं म्हणत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसची साथ सोडण्याची समाजवादी पक्षाची तयारी सुरु असल्याचे संकेत दिले आहेत.

नेमकं काय म्हणाले अखिलेश यादव ?
राजकारणात कोणीच कोणाची वाट पाहत नाही. काँग्रेसने आगामी निवडणुकीत आघाडी करणार कि नाही याबद्दल अजूनही स्पष्टोक्ती दिली नाही. त्यामुळे आम्ही अजून वाट पाहू शकत नाही. म्हणून यापुढे आम्ही आघाडीत राहू शकत नाही. बहुजन समजा पक्षासोबतच्या आघाडीविषयी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, अद्यापही काहीही निश्चित झालेले नाही. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत.

ज्याने स्वतःच्या बापाला धोखा दिला तिथ दुसऱ्यांच काय होणार ? – मुलायम

आज उन्हामुळे इव्हीएम बंद पडले, उद्या पावसामुळे बंद पडतील – अखिलेश यादव