‘अब अगले कदम की तैयारी…’ बुआ आणि बबुआची तब्बल तासभर चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : एक्झिट पोलचा कल एनडीएच्या बाजूने झुकल्याने विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरणार असे चित्र दिसत आहे. तर सपा-बसपा यांच्या युतीने उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का देत जोरदार मुसंडी मारल्याचे एक्झिट पोलचा कल सांगत असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रिमो मायावती यांची भेट घेतली. अखिलेश यादव यांनी ‘अब अगले क़दम की तैयारी…’ या कॅप्शनसह ट्विटच्या माध्यमातून मायावतींसोबतचा फोटो शेअर केला आहे.

अखिलेश यादव यांनी दुपारच्या दरम्यान बसपा सुप्रिमो मायावती यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. आगामी व्यव्हूरचनेसाठी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीपर्वीच उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांनी युती केली होती. यूपीमध्ये या पक्षांनी यंदाच्या निवडणूका एकत्रित लढवल्या होत्या.