बिचारे पत्रकार प्रश्नांची वाट पाहत बसले आणि ‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच बसून राहिले : अखिलेश यादव

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील प्रचाराची शुक्रवारी सांगता झाली. यावेळी भाजप कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यामुळे ही पत्रकार परिषद लक्षणीय ठरली.

या पत्रकार परिषदेमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. त्यामुळे आता मोदी-शहा पत्रकार परिषदेवर मोठ्या प्रमाणात टीका टिपण्णी होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी देखील मोदींच्या पत्रकार परिषदेवर टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की, ‘असे दिसते की ‘मन की बात’ चा शेवटचा भाग रेडिओऐवजी टीव्हीवर प्रसारित केला गेला आहे’. बिचारे पत्रकार प्रश्नांची वाट पाहत बसले आणि ‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच बसून राहिले. अशी टीका अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर आकाउंड वरून केली आहे.

दरम्यान मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेला मोदी उपस्थितीच का राहिले ? अशी चर्चा होत आहे. मोदींच्या या भूमिकेवर राजकीय स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. तर राज्यातील नेत्यांनी देखील मोदींच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली आहे.

पाच वर्षात एकच प्रेस, त्यातही उत्तर दिले नाही; गिनीज बुकने मोदींची नोंद घ्यावी : मुंडे

पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन ; जयंत पाटलांचा टोला