शिवसुष्टीनंतर आता पुण्यात ‘पेशवेसुष्टी’ उभारण्याची मागणी

shaniwarwada bajirao statechu

पुणे: कोथरूड येथील शिवसुष्टी उभारणीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता शनिवारवाड्यावर पेशवेसुष्टी उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीचे निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी दिली.

Loading...

मागील ९ वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या कोथरूड येथील शिवसुष्टी उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोथरूडमध्ये असणाऱ्या बीडीपीच्या ५० एकर जागेवर शिवकालीन प्रसंगांचे दर्शन घडवणारी भव्य शिवसुष्टी उभारली जाणार आहे. दरम्यान आता याच धर्तीवर शनिवार वाडा येथे श्रीमंत बाजीराव पेशवे सुष्टी उभारण्याची मागणी होवू लागली आहे. त्यामुळे नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

पेशवेसुष्टी उभारतानाच शनिवारवाडयाला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्याची उभारणी पहिल्या प्रमाणे करण्यात यावी. यामध्ये जवळपास सात मजले बांधले जातील. ज्यामध्ये राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, तसेच संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांचा इतिहास तसेच पेशवेकालीन प्रसंगांचे दर्शन घडवणारी ‘श्रीमंत बाजीराव पेशवेसुष्टी’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.Loading…


Loading…

Loading...