fbpx

बनावट बाबांची दुसरी यादी जाहीर

fake baba

लखनौ – अखिल भारतीय आखाडा परिषदेने बनावट बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वीरेंद्र दीक्षित कलनेमी (दिल्ली), सच्चिदानंद सरस्वती (बस्ती) आणि त्रिकाल भवंत (अलाहाबाद) या प्रमुख बाबांचा या यादीत समावेश आहे.या साधू, संतांपासून सामान्य नागरिकांनी दूर रहावे. यांच्या वागण्यातून कोणतीही संस्कृती दिसत नसल्याचे, अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे.

akhada

.अखिल भारतीय आखाडा परिषद ही सगळ्या आखाड्यांची प्रमुख संस्था आहे. या संस्थेची स्थापना आद्य शंकराचार्यांनी ८ व्या शतकात केली होती. हिंदू साधू व सेवकांची अखिल भारतीय आखाडा परिषद ही प्रमुख संस्था आहे. स्वामी नरेंद्र गिरी महाराजांनी ही बनावट बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला 20 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आखाडा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत आसाराम बापू, राधे माँ, स्वामी असिमानंद, निर्मल बाबा, गुरमीत राम रहिम आणि ओम बाबा यांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीत 17 जणांचा समावेश आहे.

स्वतःला महंत म्हणवून घेणारा विरेंद्र दीक्षित लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकला आहे. तर स्वतःला देशातील कथित पहिल्या महिला आखाड्याची प्रमुख आणि स्वयंभू शंकराचार्य म्हणवून घेणारी त्रिकाल भवंतही या यादीत आहे. कुंभमेळ्या दरम्यान त्रिकाल भवंताने स्वयंभू शंकराचार्य असल्याचा दावा केला. तिच्या या दाव्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. याच त्रिकाल भवंता उर्फ अनिता शर्माचा समावेश भोंदू बाबांच्या यादीत करण्यात आला आहे.

बनावट बाबांची यादी –
वीरेंद्र दीक्षित कलनेमी, सच्चिदानंद सरस्वती, त्रिकाल भवंत, आसाराम बापू, राधे माँ, सच्चिदानंद गिरी, गुरमीत राम रहिम सिंह, ओम बाबा, निर्मल बाबा, इच्छाधारी भिमानंद, स्वामी असिमानंद, ओम नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, आचार्य कुशमुनी, ब्रहस्पती गिरी, मल्खान सिंग.