fbpx

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती चिंताजनक

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची तब्येत खालावली आहे. अकबरुद्दीन ओवैसी हे एमआयएम अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांचे बंधू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अकबरुद्दीन ओवैसी हे आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज अचानक अकबरुद्दीन यांची तब्येत खालावली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील चंद्रागुगट्टू येथे उपचार सुरु असतानाच अकबरुद्दीन यांची तब्येत खालावली. हे वृत्त कळताच एमआयएम कार्यकर्त्यांनी रुग्णालया बाहेर गर्दी केली होती. अकबरुद्दीन यांची तब्येत जास्तच खालावत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लंडन येथे नेण्यात आले आहे. तर ईद मिलाप या कार्यक्रमाप्रसंगी असुद्दीन यांनी आपल्या मोठ्या बंधूंची प्रकृती उत्तम व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.