परश्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत झळकणार मुख्य भूमिकेत

टीम महाराष्ट्र देशा – ‘सैराट’ या चित्रपटातून अनेकांच्या मनात स्थान निर्माण करणारा परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर आता बॉलिवूडला ‘याड’ लावण्यास सज्ज झाला आहे. अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून आकाश बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात आकाशसोबत राधिका आपटे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

आकाशच्या बॉलिवूडमधील पदार्पणाला खुद्द अनुराग कश्यपनंच दुजोरा दिला आहे. या चित्रपटात आकाश-राधिका एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असून या चित्रपटातल्या काही दृश्यांचं शूटिंगही मुंबईत झाल्याची माहिती अनुराग कश्यपनं दिली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची स्क्रिप्ट राधिकाने लिहिली आहे.

मात्र परश्याच्या या नव्या चित्रपटाचं नाव किंवा तो कधी प्रदर्शित होणार ही माहिती सध्या गुलदस्तातच ठेवण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...