FU- ‘एफयू’चं पोस्टर रिलीज, आकाश ठोसरची ‘एफयू’मध्ये मुख्य भूमिका

अभिनेता आकाश ठोसर याच्या ‘एफयू’ सिनेमाचं एक टीझर पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. याआधी सलमान खानच्या हस्ते सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. नव्याने रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये आकाशचा या सिनेमातील डॅशिंग लूक बघायला मिळत आहे.

दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा असून, आकाश ठोसरची ‘एफयू’मध्ये मुख्य भूमिका असणार आहे.