भाजपने राणेंसारख्या जेष्ठ नेत्यांची आब राखली नाही- अजित पवार

Ajit pawar vs narayan rne (1)

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय जनता पार्टीने जेष्ठ नेते नारायण राणे यांना प्रतिष्ठेची वागणूक दिली नाही. त्यांची आब देखील राखली नाही. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात सध्या हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले भाजप सरकारच्या सांगण्यावरून राणेंनी कॉंग्रेस पक्ष सोडला. त्या नंतर भाजपने राणेंना स्वताच्या पक्षातन घेता स्वताचा पक्ष स्थापन करण्यास सांगितले. यामुळे राणेंना आमदारकीवर पाणी सोडावे लागले.