पुणे : माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी लिहलेली आक्षेपार्ह पोस्ट आणि शरद पवार यांनी जाहीरपणे वाचलेली पाथरवट ही कविता, या पार्श्वभूमीवर सुरेश खोपडे यांनी अजित पवारांना एक आवाहन केले आहे.
सुरेश खोपडे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणत आहेत की, “केतकी चितळे या तरुणीने शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट लिहिली. त्यावर प्रतिक्रिया देताना काही तरुणानी असे उद्गार काढले की “शरद पवार यांच्या विरोधात बोलणाऱ्याला शोधा आणि फोडा. हे सगळे तरुण राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून घेत होते. या बातमी नंतर लगेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या तरूणांना सज्जड दम दिला व हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यक्रम नाही, असे बजावले. ते योग्य केले.कोणीही लिहीत असेल बोलत असेल तर त्याला शोधून काढणे हे ठीक आहे. पण त्याला फोडा याला वेगळे अर्थ निर्माण होऊ शकतात, हे गुन्हेगारी कृत्य ठरते. अजित दादांनी घेतलेली भूमिका एक कायद्याच्या दृष्टीने, उपमुख्यमंत्री म्हणून योग्य आहे.तरीपण दादा तुम्ही म्हणता तशी ती केतकीची विकृती नाही तर ती ज्या ब्राह्मण वर्णीयांची बाजू लढविते त्यापैकी कांही अपवाद वगळता, बहुतेक जणांचा फार जुना व उघड कावा आहे. दादा तुमचा होमवर्क कमी पडतोय.”
“२०१६ साली आरएसएसच्या नागपूर दसरा मेळाव्यामध्ये एक निर्धार फलक त्यांनी आपल्या डायसवर ठेवलेला होता. त्याचा आशय पुढीलप्रमाणे. “कुरुक्षेत्रमे फीरसे होगा असुर शक्तिका विनाश,मनमे है पूर्ण विश्वास” या कार्यक्रमाअगोदर नुकतेच गोविंद पानसरे व इतर यांना असुर ठरवून त्यांची हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सुमारे 16 वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी पत्रक काढून या निर्धाराचा निषेध करून त्या विरुद्ध सरकारने कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यामध्ये माजी न्यायमूर्ती बी जे.कोळसे पाटील, नागेश चौधरी या सारखे असंख्य कार्यकर्ते होते. पुढं त्या मागणीच कांहीच झालं नाही”, असे खोपडे म्हणाले.
“केतकी हे फक्त एक उदाहरण आहे. तिची विकृती हा अपवाद काही वगळता ब्राह्मण वर्गीयांचा तो फार जुना व उघड कावा आहे. त्यामागे असणारी विघातक बामणी कावा समजून घ्या”, असे आवाहन सुरेश खोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :