उजनी धरणातील मासे खाताना सावधानता बाळगण्याचा अजितदादांचा सल्ला

बारामती (पुणे): उजनी धरणातलं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलं आहे. सोलापूर विद्यापीठानं हे पाणी सतत प्यायल्यानं कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचाच दाखला देत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनीचं पाणी आणि मासे खाताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

बारामतीत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत एका हॉटेलचं उदघाटन झालं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी हॉटेलमालकाला हा सल्ला दिला आहे.उजनीचे मासे न आणता इतर नद्यांचे मासे आणण्याचा सल्ला दिला. दरम्यान,उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठानं शास्त्रशुध्द अभ्यास केला असून या चाचणीत पारा, शिस आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले आहेत. त्यामुळे या धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उजनी धरणातून सोलापूरसह, उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि उस्मानाबाद या शहरांसह 400 हून अधिक गावांना या धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी माणसं आणि जनावरांनाही पिण्यायोग्य नाही, असा निष्कर्ष निघाल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

“अरे ते परवा आम्ही वाचलं, त्या उजनीचं पाणी विषारी झालं म्हणून..मासे कुठले आहेत? कायच्या काहीतरी तिसरंच व्हायचं. ते मासाबिसा विहीर-बीर तिकडनं आणत चला. माणसं बातम्या वाचतात. मी तर आश्चर्यचकीत झालो”Loading…
Loading...