भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर अनंतात विलीन

टीम महाराष्ट्र देशा – अजित वाडेकर यांच्यावर आज शिवाजी पार्क येखील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाडेकर यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. शिवाजी पार्क स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत वाडेकरांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलिसांकडून वाडेकरांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.

वाडेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. वरळी सी फेस येथील स्पोर्टसफील्ड अपार्टमेंट निवासस्थानी वाडेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून क्रिकेट वर्तुळातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी वाडेकरांचे अंतिम दर्शन घेतले.

कवी मनाच्या अटलजींच मराठी प्रेम