घटस्फोट न देताच मोदींनी पत्नीला सोडलं, अजित सिंह यांची मोदींवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान सर्वच नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे ते बोलत होते.

नरेंद्र मोदी सरकारने मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या पत्नीला घटस्फोट (तलाक) न देताच सोडून दिले आहे अशी टीका अजित सिंह यांनी केली आहे. पुढे बोलताना अजित सिंह म्हणाले, मोदी खोटं बोलत नाहीत परंतु ते कधी खरंही बोलत नाहीत ते फक्त लहान मुलांना खर बोलण्याचा सल्ला देतात अशी टीका त्यांनी मोदींवर केली.

यापूर्वीही नरेंद्र मोदींवर बऱ्याच नेत्यांनी टीका केली आहे यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जावेद अहमद राणा यांचा समावेश आहे.