३ वर्ष उलटले तरी कोपर्डी अजूनही उपेक्षितच, अजित पवारांनी वेधले लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : कोपर्डी येथील नववीत शिकणारी निर्भया (नाव बदललेले आहे) १३ जुलै २०१६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. आपल्या आजोबांच्या घरुन मसाला घेऊन परतत असताना वाटेत तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तिचा निघृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र त्यावेळी सरकारने दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाही त्यावरून आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे.

कोपर्डी अत्याचार, हत्या प्रकरणी त्या पीडित मुलीचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत सरकारकडे आस लावून आहे. यात राजकारण नको पण देवेंद्र फडणवीसजी गावात पोलीस चौकी, माध्यमिक शाळा, पक्के रस्ते,दवाखाना उभारण्याची दिलेली आश्वासनं अपूर्णच आहेत. कृपया, लक्ष द्या. अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Loading...

दरम्यान, या गावामध्ये घटना घडून तीन वर्षे झाली असली तरीही आजही गावामध्ये महिला आणि मुलींमध्ये तेवढीच भीती दिसून येते. रात्र झाली की मुली घराच्या बाहेर सहसा पडत नाहीत. पीडितेच्या घरासमोर आजही चार पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांना दोन पोलीस संरक्षणासाठी दिले आहेत.

गावामध्ये शाळा नसल्याने मुलीना पाच किमी अंतरावरील शाळेमध्ये जाण्यासाठी एस.टी. चा फक्त आधार आहे. जर एस टी आली नाही तर मुलींची शाळा त्या दिवशी बुडते. सरकारने गावामध्ये माध्यमिक विद्यालय सुरू करू असे आश्वासन दिले होते,मात्र ते पूर्ण केले नाही. गावामध्ये सरकारी दवाखाना , कुळधरण मध्ये पोलीस चौकी सुरू करू, कोपर्डी ते राक्षसवाडी रस्त्याचे डांबरीकरण करू, ही आश्वासनेही पूर्ण झाली नाहीत. कोपर्डी येथे कोणत्याही कंपनीचे नेटवर्क फारसे चांगले मिळत नसल्याने नागरिकांनी मोबाइल टॉवर उभा करण्याची मागणी केली, पण ती पूर्ण झालेली नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ