आता काय माणसांचा जीव गेल्यावर सांगतो का ? अजित पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे. यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कर्नाटकच्या यदियुरप्पांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे आमदार मुंबईत ठेवता येतात. पण त्यांचं सरकार आल्यावर यांना पान्हा फुटत नाही. म्हणतात आम्ही धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी यदियुरप्पांना सांगतो. आरे काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसं मेल्यावर?’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला आहे.

तसेच अजित पवार यांनी पुढे बोलताना ‘सरकारने सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीचं योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे तेथे अशी परिस्थिती उद्भवली आहे. तसेच कोल्हापुरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास उशीर का केला असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीला आलेला पुर हा कर्नाटक सरकारच्या निष्काळजीपणामुळे आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागात आलेला पूर महाराष्ट्र सरकारच्या चुकीमुळे आला असल्याचा कांगावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.

#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’

30 वर्ष पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा उद्या शिवसेनेत प्रवेश ?

Breaking : महाराष्ट्रातील भाजपची महाजनादेश यात्रा स्थगित