fbpx

पाच वर्षात सरकारने अनेक घोटाळे केले; अजित पवारांचा हल्लाबोल

हिंगोली : राज्यामध्ये आघाडी सरकारने सुरळीतपणे राज्यकारभार चालवला होता. मात्र पाच वर्षात युती सरकारने अनेक घोटाळे केले ,असून आदिवासी विभागाच्या साहित्य खरेदी घोटाळा, जमीन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचा समावेश असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार रामराव वडकुते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, युती सरकारने पाच वर्षातच राज्यावर अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती कर्जबाजारी झाला असून त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय जीएसटी लागू करून सरकारने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे युतीचे सरकार समाजात भांडणे लावून फूट पाडत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत आहेत. राष्ट्रवादीपक्षातून इतर पक्षात जाणाऱ्या लोक प्रतिनिधी बद्दल बोलताना ते म्हणाले की ज्यांची पक्षावर निष्ठा असेल ते पक्षात राहतील. ज्यांची निष्ठा नाही ते पक्ष सोडून देतील. पक्षावर निष्ठा असलेल्यांना सोबत घेऊन जाऊ, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या