‘हा’ गुरुजी देशात गरळ ओकण्याचे काम करत आहे; अजित पवारांचा घणाघात

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ म्हटला जातो. समाजात काय पेरले जाते. याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून याला आपण एकजुटीने अशा मानसिकतेला विरोध करणे आवश्यक आहे. गुरुजींबदद्ल आम्हाला आदर असायचा. मात्र हा गुरुजी देशात गरळ ओकण्याचे काम करत आहे. अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे संथापक संभाजी भिडेवर यांच्यावर टीका केली आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी पक्ष आणि चिंतामणी ज्ञानपीठ कडून यंदाच्या वर्षी सुचिता भिडे चाफेकर, विद्या बाळ,कीर्ती शिलेदार आणि प्रमिला संकला यांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी आमदार बापूसाहेब पठारे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे,कार्यक्रमाचे संयोजक अप्पा रेणुसे, दत्तात्रय धनकवडे आणि विशाल तांबे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?

पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरु केली. मात्र त्याच भिडे आडनावाशी साधर्म्य असणारी एक व्यक्ती माझ्या बागेतील आंबे खाल्ल्यानं मुलगे होतात असं सांगतात.आपण जे बोललो त्याचा त्यांना खेदही नाही. पुन्हा एकदा महिलांना चूल आणि मूल यातच जुंपण्याचा डाव आहे की काय अशी शंका येते.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ म्हटला जातो. समाजात काय पेरले जाते.याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून याला आपण एकजुटीने अशा मानसिकतेला विरोध करणे आवश्यक आहे. गुरुजींबदद्ल आम्हाला आदर असायचा. मात्र हा गुरुजी देशात गरळ ओकण्याचे काम करत आहे.