मुंबई : जून मध्ये झालेल्या मोठ्या राजकीय नाटकानंतर राज्यात शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे कधी काय होईल आणि अचानक दिवस बदलत असतात असा इशारा देत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी इशारा दिला आहे.
अजित पवार यांनी दिला सूचक इशारा :
आम्ही देखील अनेक वर्ष सरकारमध्ये होतो हे लक्षात ठेवा, आमच्यातर्फे पवार साहेब केंद्रामध्ये कृषिमंत्री पद मंत्री असताना आमच्याकडे केंद्रातील सत्ता होती, राज्यातील सत्ता होती, जिल्हा परिषद होती, एकाद दुसरी सोडली तर जवळपास सर्व पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या, इतर संस्थाही ताब्यात होत्या, मात्र आम्ही कधी सत्तेचा माज केला नाही, असं पवार म्हणाले.
सत्तेपायी आम्ही कधी कुणाला विशेषतः विरोधकांना त्रास दिला नाही :
सत्तेपायी आम्ही कधी कुणाला विशेषतः विरोधकांना त्रास दिला नाही, या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मला सांगायचं आहे की, अधिकाऱ्यांनो आणि कर्मचाऱ्यांनो कुणाच्या दबावाला बळी पडू नका तसेच कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलतात, आम्ही कधी सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
यानंतर जर मला कळालं की यांनी जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला आहे, तर… :
यादरम्यान, यानंतर जर मला कळालं की यांनी जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला आहे, तर ते मी सहन करणार नसल्याचा इशारा देखील अजित पवार यांनी यावेळी दिला आहे. आमच्या लोकांचं काही चुकलं, अगदी मी जरी चुकलो तरी कारवाई करा, कारण कायदा नियम सर्वांना सारखाच आहे, मात्र, काही चूक नसताना काही दोष नसताना केवळ सत्तेत असल्यामुळे माणूस सांगतोय म्हणून कुणाला तरी त्रास देण्याचा प्रयत्न केला ते चालणार नाही, तसेच अशा लोकांना मी सांगू इच्छितो की, हे बाबू शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही, हे संविधानाने कोणाला शिकवलेलं नाही, नियम कायदे सर्वांना सारखे असतात, याची दखल सर्वांनी घ्यावी असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Gandhi । राहुल गांधींचा पवार पॅटर्न, कर्नाटकात भर पावसात सभा गाजवली, भारत जोडो यात्रेतील Video
- Raosaheb Danave | ‘भाजपशी युती नको’, म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर दानवेंचा हल्ला
- IND | पहिले देश नंतर मी, विराटच्या निस्वार्थपणाचा पाहा VIDEO
- Girish mahajan | एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- Gopichand Padalkar | “बारामतीचा शरद पवार नावाचा माणूस…”; एकेरी उल्लेख करत पडळकरांचा शरद पवारांवर हल्ला