पुण्यातील अजित पवार समर्थक नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरीही राष्ट्रवादीला धक्के बसत आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कामठे यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात पुरंदर आणि हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

जालिंदर कामठे हे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्यानंतर गेल्या वर्षापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा ते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिला मेळावा शरद पवार यांनी घेतला होता. त्यासाठी कामठे यांनी मोठा पुढाकार घेऊन जिल्ह्यातील अनेक नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

जालिंदर कामठे पुरंदर हे तालुक्यातील विधानसभा उमेदवारी चे दावेदार असताना त्यांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये डावलण्यात आले होते. तसेच या खेपेला देखील माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना पुढे केल्याने पुरंदर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी होती .कामठे यांनी या नाराजी मधूनच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

दरम्यान, आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनेक नेत्यांनी सोडचिट्ठी दिली आहे. त्यात चित्र वाघ, वैभव पिचड, जयदत्त क्षीरसागर, भास्कर जाधव, विजयसिंह मोहिते पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या