शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यातील भेटीवर अजित पवारांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

ajit pawar

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. पण अनेकांना माहिती नसेल की यामागे एक आणखी एका मोठ्या व्यक्तीचा हात आहे. राजकारणातले चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार म्हणून काम केले.

दरम्यान आज प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जावून जाऊन भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास भेट झाली. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी स्वतः सांगितलं मी यापुढं रणनीतीकार म्हणून काम करणार नाही आहे. तसंच शरद पवार वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत असतात.

पुढे अजित पवार म्हणाले की, आता प्रशांत किशोर यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही. केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार असं नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे. परंतु बंगालच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रशांत यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP