जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर अजित पवारांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया

ajit dada

पुणे – कॅगने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा,खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी (open enquiry) करण्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे.

यासंदर्भात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच कॅगचा अहवाल आणि सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून खुली चौकशी करावी यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश देऊन भाजपला चांगलाच दणका दिला आहे. ही चौकशी SIT मार्फत होणार आहे. तर ‘सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात’, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.जलयुक्त शिवार योजनेवर एसआयटीची चौकशी लावली ही सुबुद्धीने नाही तर कॅग’च्या अहवालानुसार नेमण्यात आली असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:-