‘खडसेंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली’

khadase-pawar

मुंबई- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील आज हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते या सोहळ्यास उपस्थित होते.तसेच कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी इत्यादी अनेक राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव गृहविलगीकरणात असल्याचं सांगण्यात येत आहे.ते ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचं कार्यालयीन कामकाज नियमित सुरू आहे, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री कार्यालयानं दिली.

दरम्यान, अजित पवार तानी खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. पवार आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात,एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो.  खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल.  खडसेसाहेब,  रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो.

महत्वाच्या बातम्या-