शिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना भाजप युती बाबत शिवसेना भाजप नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हि युती होणार असल्याची शाश्वती देऊ लागले आहेत. राम मंदिरासारख्या मुद्यांवर आमच एक मत झालं असं म्हणून शिवसेना भाजप नक्की युती करतील असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आज निर्धार परिवर्तन यात्रा जळगाव येथे पोहचली त्यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले तर त्यांना फटका बसेल तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत असलेली मोदी लाट आता ओसरली आहे. जनतेच्या मनात आता सरकार विषयी नाराजी आहे. या सरकारने फक्त आश्वासने दिली, कामं केली नसून उलट उच्च शिक्षित व इंजिनीअर झालेल्या युवकांना पकोडे तर युवतींना चहाची दुकान लावून आपला उदनिर्वाह करण्याची वेळ युती सरकारन आणून ठेवली आहे असे देखील पवार म्हणाले.

तसेच आघाडी सरकारच्या काळात अधिकारी बिनधास्तपणे कामं करायचे पण या युती सरकारच्या काळात अधिकारीवर्ग नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.