अजित पवारांच्या डोकेदुखीत वाढ; सिंचन घोटाळ्याचा निकाल लागणार

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी ठरलेला सिंचन घोटाळा प्रकरणाच्या केसचा निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाला आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तत्परतेने पुरवत असून, कोणत्याही क्षणी त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भारतीय जनता पार्टीने कायद्यानुसार ज्यांच्यावर कारवाई करायची होती, त्यांच्यावर कारवाई केली. म्हणूनच छगन भुजबळ दोन वर्ष आत राहिले, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्ती युती तुटली होती. मात्र पुन्हा शिवसेना सत्तेत आली, शिवसेना बाहेर पडावी यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसल्याचा उपरोधिक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत विरोधकांना लगावला.