उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ajit pawar vs uddhav thackrey

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना – भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकारी असा उल्लेख केला आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले. या वक्तव्यानेच भविष्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का? असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत. यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कस सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात,’ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या