अजित पवारांचा निर्णयांचा धडाका : ‘सारथी’ला ८ कोटींची मदत जाहीर

blank

मुंबई : सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. उद्याच सारथी संस्थेला आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती पवारांनी दिली. सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत मिळावी आणि संस्थेची स्वायत्तता कायम राहावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. त्या संदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

‘सारथीबद्दलची बैठक झाली. वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी देखील बैठकीला होते. मागे एकनाथ शिंदे यांनी मागे चर्चा केली होती. कोरोनाचं संकट असताना सारथी काही बंद केली जाणार नाही. वेगवेगळ्या अफवा या दरम्यान आल्या. मात्र सारथीबाबत सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावून या संस्थेसाठी काम करणार आहे,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार असल्याची ग्वाही यावेळी पवार यांनी दिली. सारथी संस्थेला उद्याच्या उद्या 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार, वडेट्टीवार यांचं खातं ती रक्कम देईल अशी घोषणा देखील त्यांनी केली.

सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल 14 दिवसात द्यायचा आहे .मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की सारथी नियोजन विभागाच्या अंतर्गत येणार…अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागात आणणार असल्याचं आश्वासन देखील पवार यांनी दिले.मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आम्ही ठरवलं आहे असं पवार म्हणाले.

‘राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा सीबीएसईचा निर्णय उघड राष्ट्रद्रोह’

‘महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट’

मास्क, सॅनिटायझरच्या साठेबाजी काळा बाजाराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन – वंचित