सत्ताधाऱ्यांना चर्चांमध्येचं गुंतु द्या,आपण जोमाने काम करू, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : सत्ताधाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु आहेत. त्यांना चर्चाचं करु द्या. पण आम्हाला वाटतं मुख्यमंत्री आघाडीचाच झाला पाहिजे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापना दिनी कार्यकर्त्यांचे खचलेले मनोबल वाढवले.

आज १० जून १९९९रोजी शरद पवारांनी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे देशात जरी नरेंद्र मोदींची लाट असली, त्याचं सरकार बहुमतानं आलं असल तरी . कार्यकर्त्यांनी आता जोमानं कामाला लागावं असं अजित पवार म्हणाले.

Loading...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच सत्ताधा-यांमध्ये येणा-या निवडणूकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार चर्चा सुरु आहेत. त्यांना चर्चा करु द्या. आम्हाला वाटतं मुख्यमंत्री आघाडीचाच झाला पाहिजे. राज्यात आता हवामान बदलते आहे. तरी देखील राज्याला दुष्काळाने ग्रासले आहे. बेरोजगारी वाढत आहे. यावर ठोस भूमिका घेणे सत्ताधाऱ्याना जमले नाही. त्यामुळे त्यांना चर्चांमध्येचं गुंतु द्या.आपण जोमाने काम करू, असे पवार यावेळी म्हणले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातून घवघवीत यश मिळाले आहे. तसेच कॉंग्रेस आघाडीचा राज्यातून सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. यासाठी दोन्ही कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील