जिल्हा बँकांना नोटा बदलून द्या :अजित पवार

ajit_pawar
सरकारने हजार व पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्या नंतर  बँकांनी जुन्या नोटा स्वीकारल्या परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरही रिझर्व्ह बँकेकडून नोटा बदलून मिळत नसल्याच चित्र राज्यभर पहायला मिळतंय या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  जोपर्यंत जिल्हा बँकांना नव्या नोटा मिळत नाहीत तोवर शेतकऱ्यांना दहा हजारांचीही मदत करणे अवघड असल्याचे म्हटले आहे .  बारामतीत केला. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सरकारवर सडकून टीका केली.जिल्हा बँकांची स्थिती या एकाच निर्णयाने अवघड झालेली असून शेतकऱ्यांची बँक असलेल्या या जिल्हा बँकांबाबत सरकारचे धोरण अपयशी ठरल्याचे समोर येत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.
कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा
सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे ही फसवी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम शासनाने केल असून  कर्जमाफीचा फायदा कोणालाच मिळू द्यायचा नाही अशीच सरकारची मानसिकता दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.