पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडाच्या विकासांच्या कामाला हवा तेवढा निधी देण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ आज विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी विविध मोठ्या घोषणा केल्या.

त्याचबरोबर पवार यांनी राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर या चार तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी देणार असल्याचे सांगतिले. तसेच जेजुरी गड, सांगलीतले बिरुदेव देवस्थानच्या विकास आराखड्यास निधी देणार. अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासालाही पुरेसा निधी उपलब्ध करुन देणार. नामदेव महाराजांच्या नरसी नामदेवच्या विकासाला पुरेसा निधी देणार असल्याचे ते म्हणाले. बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारण्याची घोषणाही त्यांनी विधानसभेत केली.

दरम्यान, काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते. यादरम्यान ते बंजारा समाजाचे आराध्यस्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर दर्शनासाठी गेले होते. यावेळी तिथे जमलेल्या गर्दीमुळे पोहरादेवी गडाचे नाव समोर आले. याच गडाला पाहिजे तितका विकासनिधी देऊ असे सांगितले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना आता पूर्णत्वास येणार आहे. शासनामार्फत आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

IMP