Ajit Pawar। मुंबई : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही सध्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. याआधी अनेकवेळा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केली जात होती. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार राखडलेलाच आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे यावरून वारंवार सरकारला जाब विचारत आहेत.
अजित पवार म्हणाले कि, आम्ही आरोप करत नाही. वस्तुस्थिती आहे. शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. मुखमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, हे सांगायचे बंद करावे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.
यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. पुणेकरांनी पाच वर्षे भाजपाचा कारभार पाहिला आहे. मीही अडीच वर्षे पालकमंत्री होतो. मी आपले पुणे, आपला जिल्हा म्हणून काय केले हे पुणेकरांनी पाहिले आहे. उद्याची 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन पुण्याचे नियोजन केले. मात्र आता तर महिना झाला तरी पालकमंत्री नाही, मंत्रिमंडळ नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, याआधीहि अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारला जाब विचारला होता. पवार म्हणाले कि, लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत दिली पाहिजे. राज्य सरकारने ताबडतोब अधिवेशन बोलावलं पाहिजे. पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यात होतं. पण जुलै झाला. ऑगस्ट आला. तरीही यांना मुहूर्त मिळेना. मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठला ग्रीन सिग्नल मिळेना की त्यांच्यात एक वाक्यता होईना? मंत्रिमंडळ विस्तार करायला कशाला घाबरत आहेत हे कळायला मार्ग नाही?, असा हल्लाबोल त्यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Aslam Sheikh | काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ, मढ मार्वे स्टुडिओ घोटाळाप्रकरणी नोटीस
- Raosaheb Danve | “आधी स्वतःच्या मुलाचं नाव ‘औरंगजेब’ ठेवा, मग…”; रावसाहेब दानवेंचा जलील यांना टोला
- Patra Chawl scam | ED संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची समोरासमोर चौकशी करण्याची शक्यता
- Amit thackeray | “शिंदेंनी बंड केलं नसतं, तर दौरे केले असते का?”, अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मोठा निर्णय! मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<