गद्दरी केली तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे”

पुणे : निवडणुकीत गद्दारी केल्यास याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या बिनधास्त टोलेबाजी केली.

अजित पवार म्हणाले, “मालेगाव कारखान्याचा अध्यक्ष सभासदांच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. त्यांनी कारखाना आणि शिक्षण संस्थेचं वाटोळं केलं. मी मंत्री मंडळात असून तुमचा सहावा गट निर्माण करणार आहे. बारा जागा भरायच्या असून तो निर्णय घेणार आहे. त्यासाठी पॅनल टू पॅनल मतदान करा. मला मतदान बूथनुसार केलेलं मतदान कळणार आहे. दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं करणाऱ्यांची गंमत करेल. आता ऐकणार नाही. 30 वर्षे ऐकलंय. मी कुणालाही माफ करणार नाही. फोनचे रेकॉर्ड काढून चौकशी करणार आहे. माझा एनसीपी म्हणून मिरवणाऱ्यांनी गद्दारी केली तर याद राखा. गाठ माझ्याशी आहे.”

Loading...

तसेच “तुम्ही कामांसाठी थेट प्लॅन आणि इस्टिमेट काढून या. उपमुख्यमंत्री झाल्यापासून मी नदी पात्र दुरुस्तीचं काम स्वतः जाऊन पाहतोय. कामासाठी निधी देईल मात्र स्थानिक पातळीवर कामाला विरोध नको. कामाच्या बाबतीत पाठपुरावा करण्यास तुम्ही कमी पडू नका. मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत सर्वात जास्त विकास करणार आहे. असं केलं नाही, तर पवारांची औलद सांगणार नाही.”

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय