‘कोल्हापूरकरांनो आम्हाला हौस नाही, थोडं सोसा !’, अजितदादांनी दिले निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत

ajit pawar

कोल्हापूर : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला. या लाटेत कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक रुग्ण नोंदवले गेले असून हजारो नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आता राज्यात स्थिती आटोक्यात येत असून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसऱ्या बाजूला कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे.

कोल्हापुर जिल्ह्यात दररोज सुमारे १५०० हुन अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. तर, कोरोनामुक्तांचा आकडा देखील नव्या कोरोना बाधितांपेक्षा कमी आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १६ टक्के इतका असून तो राज्यातील सर्वाधिक रेट आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाला कोरोनाला अटकाव घालण्यात अपयश आले असून आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला आहे.

‘कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा, कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी कोल्हापूरकरांना सुनावलं आहे.

कोल्हापूरकरांच्या बेफिकिरीवर अजितदादांनी व्यक्त केली तीव्र नाराजी !

बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी, असं अजित पवारांनी ठणकावलं आहे. कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

IMP