अजितदादांनी ताकद दिली दाखवून,भाजप सरकारच्या काळातील ‘तो’ निर्णय फिरविला

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत बारामती- इंदापूरला जाणारे जादा पाणी बंद करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय महावकिास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना धोबीपछाड दिला आहे.

याअगोदर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात निरा देवघर धरणातील पाणी वाटपाच्या सूत्रात बदल करीत डालव्या कालव्यातून ६० टक्के तर उजव्या कालव्यातून ४० टक्के पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा फायदा बारामती तालुक्याला मोठ्याप्रमाणावर झाला होता. या पाणीवाटपाचा कालावधी ३ एप्रिल२०१७ पर्यंत होता. मात्र ही मुदत वाढविण्याच्या हालचाली सुरू होताच भाजपाचे माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना शरद पवार आणि अजित पवारांच्या दबावामुळे बारामतीला देण्यात आलेले वाढीव पाणी बंद करण्याची मागणी करीत आवाज उठविला होता.पुढे बारामती- इंदापूरला जाणारे जादा पाणी बंद करण्याचा फडणवीस सरकारने बंद केले होते.

Loading...

दरम्यान, काल झालेल्या बैठकीत अजित पवारांनी आपली ताकत दाखवून दिली. निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल.

निरा देवघर धरणाचे काम सन -2007 मध्ये पुर्ण असुन 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे व गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मीत झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजीत लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही,ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.हे वाटप निरा डावा कालवा 55 % व निरा उजवा कालवा 45 % असे राहील.

या निर्णयामुळे दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये समन्यायी तत्वावर 2427 हेक्टर/टीएमसी या प्रमाणात पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल. निरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुरंदर व बारामती, इंदापूर तालुक्यातील 37070 हे. लाभक्षेत्राला व निरा उजव्या कालव्याच्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर सांगोला तालुक्यांच्या 65506 हे. लाभक्षेत्राला फायदा होईल.

आठ तालुक्यातील ग्रामीण / शहरी भागाच्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. निरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बिगर बारमाही पंढरपुर व सांगोला तालुक्यातील ब्रँच 2 च्या खालील वितरीकांना उन्हाळी हंगामामध्ये सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकरण व परिसरातील कृषीपूरक उद्योग जसे साखर कारखाने, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री फॉर्म व फळबागांवर अवलंबून असणारे उद्योग सुरळीतपणे चालू राहतील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश