fbpx

अजित पवारांसह राष्ट्रवादी नेते ‘लोकल’मध्ये ; सीएसटी ते डोंबिवली प्रवास

टीम महाराष्ट्र देशा:माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटील,शशिकांत शिंदे,जितेंद्र आव्हाड यांनी लोकलने प्रवास केला आहे. डोंबिवलीत  माथाडी नेते गुलाबराव जगताप यांचा वाढदिवस आणि तेथील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी डोंबिवलीपर्यंत सीएसएमटीवरून कसारा जलद लोकलने प्रवास केला. राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी लोकलमध्ये काढलेला  व्हिडीओ शेअर केला आहे.

कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून निघाले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  त्यांनी लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.