कार्तिकी एकादशी निमित्त अजित पवार विठूरायाच्या पूजेसाठी जाणार!

ajit pawar

पुणे : यंदा सण-उत्सव साजरे करण्यावर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्बंध आले आहेत. गणेशोत्सव, ईद, दसरा, यासोबतच सर्व धर्मिय सणांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्व सण साधेपणाने व खबरदारीने साजरे करावेत असे आवाहन प्रशासनाने केले होते.

आता, कार्तिकी एकादशी काही दिवसांवर आली असून आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांची परंपरेनुसार पार पडणारी पायी वारी कोरोनामुळे चुकली. पोलिसांसह सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वारकऱ्यांनी घरूनच आपल्या विठू रायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सह कुटुंब पंढरपूर गाठून शासकीय पूजा देखील केली.

मात्र, आता कार्तिकी एकादशी निमित्त वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता यावे यासाठी काही वारकरी संघटना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. तर, कार्तिकी एकादशीला होणारी शासकीय पूजा पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.

पंढरपूर मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय पूजेचे निमंत्रण देण्यात आले होते. आता, अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. कार्तिकी वारीवर निर्बंध लादण्यात आले असून राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे, पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येत नसेल तर मग उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा सूर उमटू लागला आहे.

महत्वाच्या बातम्या